US Israel Iran War: इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धात आता इराणला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) मुख्य प्रवक्ते, ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नाईनी हे या युद्धात ठार झाले आहे. इराणवरील हल्ल्यांमध्ये नाईनी मारले गेले. IRGC ची सर्व अधिकृत निवेदने आणि प्रचार केवळ नाईनी यांच्या मंजुरीनंतरच जारी केले जात होते. त्यांना IRGC च्या मानसिक युद्ध आणि जनसंपर्क पथकाचे प्रमुख मानले जात होते. मृत्यूच्या काही काळ आधी, निम-सरकारी तस्निम वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नैनी म्हणाले होते, “ट्रम्प म्हणाले नव्हते का की इराणचे नौदल नष्ट झाले आहे? तसे असेल तर, त्यांनी आपले धैर्य दाखवून आपली जहाजे पर्शियन आखातात पाठवावीत.” त्यांनी हेही पुनरुच्चारित केले होते की, युद्ध सुरू असूनही इराण क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू ठेवत आहे आणि कोणतीही मोठी कमतरता नाही.” US Israel Iran War: अमेरिका -इस्रायलसोबत सहा महिन्यांचे युद्ध लढण्याचा दावा US Israel Iran War: नाईनी अलीकडेच अनेकदा माध्यमांमध्ये दिसले होते. त्यांनी दावा केला होता की, इराण अमेरिका आणि इस्रायलसोबत किमान सहा महिने “उच्च-तीव्रतेचे” युद्ध लढू शकतो. त्यांनी सांगितले की, इराणने आतापर्यंत फक्त जुन्या पिढीतील क्षेपणास्त्रे वापरली असून, नवीन आणि अधिक प्रगत क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत, जी लवकरच तैनात केली जातील. त्यांची ही विधाने इराणला ‘अजेय’ म्हणून सादर करण्याच्या उद्देशाने होती. आयआरजीसीच्या अनेक प्रसिद्धीपत्रके, टीव्ही मुलाखती आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये नैनी यांचे नाव ठळकपणे दिसून आले. नैनी शत्रूसाठी एक ‘सरप्राईज’ तयार करत होते US Israel Iran War: अलीकडेच, नाईनी यांनी सांगितले की क्षेपणास्त्र क्षेत्रात ‘कोणतीही चिंता नाही’, कोणताही मोठा साठा नाही आणि उत्पादन ‘आश्चर्यकारक’ पातळीवर सुरू आहे. त्यांनी इराणी कॅलेंडर वर्ष १४०४ (२०२५-२०२६) साठी क्षेपणास्त्र उद्योगाला ‘२०/२० चा परिपूर्ण गुण’ दिला, म्हणजेच तो पूर्णपणे यशस्वी आहे. नाईनी यांनी पुढे सांगितले की इराणच्या शत्रूंसाठी ‘आश्चर्य’ तयार केले जात आहे. युद्ध जसजसे पुढे जाईल, तसतसे घडामोडी अधिक गुंतागुंतीच्या आणि अनपेक्षित होतील. त्यांनी दावा केला की, आतापर्यंत फक्त जुन्या पिढीतील क्षेपणास्त्रे वापरली गेली असून, नवीन आणि अधिक प्रगत क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत. आयआरजीसीने यापूर्वी म्हटले आहे की इराण किमान सहा महिने उच्च-तीव्रतेचे युद्ध लढू शकतो.