US Iran War: मोठी बातमी ! इराणकडून आखाती देशांमधील ८ प्रमुख पुलांची ‘हिट लिस्ट’ जाहीर ; अमेरिकेने सर्वात उंच पूल पाडल्याने विध्वंसाचा आखला प्लॅन
US Iran War: इराणने आपल्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिका आणि इस्रायल या दोघांचेही मोठे नुकसान केले आहे. या युद्धाचा परिणाम आखाती देशांवरही झाला आहे.

US Iran War: इराणने आपल्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिका आणि इस्रायल या दोघांचेही मोठे नुकसान केले आहे. या युद्धाचा परिणाम आखाती देशांवरही झाला आहे. विशेष म्हणजे, एक महिना उलटूनही युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
दरम्यान, या संघर्षाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इराणने अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांवर सूड घेण्यासाठी एक मोठी योजना आखली आहे. तेहरानने आखाती देशांमधील आठ प्रमुख पुलांची लक्ष्य यादी जाहीर केली आहे. अमेरिकेने अलीकडेच इराणमधील एक प्रमुख पूल उद्ध्वस्त केल्यामुळे तेहरानला ही यादी जाहीर करावी लागली.
गुरुवारी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वात उंच पूल उद्ध्वस्त झाल्यानंतर, इराणने मध्य-पूर्वेतील आठ प्रमुख पुलांची लक्ष्य यादी तयार केली आहे. तेहरान प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे.
फार्स वृत्तसंस्थेनुसार, आखाती देश आणि जॉर्डनमधील अनेक प्रसिद्ध पूल इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे संभाव्य लक्ष्य असू शकतात. इराणच्या सर्वात उंच पूल, बी१ ब्रिजवरील दोन हल्ल्यांनंतर, इराणने त्यांना धडा शिकवण्याची योजना आखली आहे.
इराणकडून आखाती देशांमधील प्रमुख पूल रडारवर US Iran War:
अनादोलूच्या एका अहवालानुसार, इराणच्या यादीत कुवेतचा शेख जाबेर अल-अहमद अल-सबाह सागरी पूल, संयुक्त अरब अमिरातीचा शेख झायेद पूल, अल मक्ता पूल आणि शेख खलिफा पूल, सौदी अरेबियाला बहरीनशी जोडणारा किंग फहद कॉजवे, तसेच जॉर्डनचा किंग हुसेन पूल, दामिया पूल आणि अब्दौन पूल यांचा समावेश आहे.
अमेरिकेने बी-१ पुलावर दोनदा हल्ला केला US Iran War:
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या बी-१ पुलावर दोनदा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, हा पूल पूर्णपणे तयार झाला नव्हता, तरीही तो नष्ट करण्यात आला. बी-१ पूल हा मध्य-पूर्वेतील सर्वात उंच पूल होणार होता. तो तेहरानला करजशी जोडतो. करज पुलावरील हल्ल्यात दोन जण ठार झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले.






