US-Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक करार हवा असल्याचे वक्तव्य नुकतेच केले होते. परंतु आता त्यांच्या या विधानावर इराणकडून एक तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी, “जोपर्यंत त्यांच्या सर्व अटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत युद्ध सुरूच राहील.”असे स्पष्टपणे म्हटले आहे. मोहसेन रझाई यांनी पुढे बोलताना,”इराण माघार घेणार नाही.” असे ठामपणे देखील म्हटले आहे. रझाई यांनी, इराणची मागणी आहे की, झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई मिळावी, सर्व आर्थिक निर्बंध हटवले जावेत आणि अमेरिका त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही याची आंतरराष्ट्रीय हमी मिळावी.” अशा मागण्या केल्या आहेत. यावेळी प्रत्युत्तर पूर्वीपेक्षा तीव्र असणार US-Iran War: या सर्वावर कठोर भूमिका घेत लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी, “यावेळी प्रत्युत्तर पूर्वीसारखे नसेल. ते म्हणाले की, ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ असे होणार नाही, तर ‘डोक्याच्या बदल्यात डोके’ असे होईल आणि विरोधकांना आखाती प्रदेश सोडण्यास भाग पाडले जाईल” असे म्हटले. US-Iran War: रझाई यांनी यावेळी इराणी सैन्य पूर्ण ताकदीनिशी कारवाई करत आहे आणि युद्धादरम्यान दबाव कायम ठेवण्यासाठी सतत कारवाया सुरू आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका US-Iran War: रेझाई यांनी दावा केला की, अमेरिका तयार असल्याने हे युद्ध आठवडाभरापूर्वीच संपू शकले असते, परंतु बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्ध सुरू ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांच्या मते, या युद्धात विजयाचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही, हे आता अमेरिकेला समजले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी, अमेरिका एका वरिष्ठ इराणी नेत्याशी चर्चा करत आहे आणि इराणला तडजोड करायची आहे असे म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनीही एका इराणी नेत्याशी संवाद साधला आहे, मात्र त्यांनी त्या नेत्याचे नाव सांगितले नाही. हे लक्षात घ्यायला हवे की, अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ल्यांची मालिका सुरू केली, ज्यामुळे या युद्धाला सुरुवात झाली.