US Iran War: “जर तुम्ही अमेरिकेला पाठिंबा दिला तर…” ; इराणने आता दक्षिण कोरियाला दिला इशारा
US Iran War:

US Iran War: अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. इराणला मदत करू नये यासाठी अमेरिकेने इतर देशांवर दबाव आणला आहे. इराणला मदत करणाऱ्या देशांना मोठे नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगई यांनी पर्शियन आखातात लष्करी उपस्थिती हे आक्रमकतेचे समर्थन असल्याचे वर्णन केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे. (US Iran War)
त्यांनी लिहिले – इराण आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील संबंध 64 वर्षांहून अधिक जुने आहेत आणि दोन्ही देशांमधील संबंध नेहमीच परस्पर आदराच्या आधारावर विकसित झाले आहेत. (US Iran War)
इराण कोरिया प्रजासत्ताकासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना खूप महत्त्व देतो. मात्र, सध्या इराणी जनता अमेरिकेच्या आक्रमक कारवायांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा ते अमेरिकेच्या महिला आणि मुलांवरील युद्ध गुन्ह्यांना धैर्याने प्रतिसाद देत असतील, तेव्हा पर्शियन आखाती आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इतर कोणत्याही देशाची लष्करी उपस्थिती किंवा ऑपरेशनमध्ये सहभाग आक्रमकांना थेट पाठिंबा मानला जाईल आणि त्याचे गंभीर परिणाम होतील. (US Iran War)
अमेरिकेपुढे झुकता कामा नये (US Iran War)
त्यांनी पुढे लिहिले की, कोणत्याही सार्वभौम आणि जबाबदार देशाने अमेरिकेच्या दबाव आणि धमक्यांपुढे झुकता कामा नये आणि इराणी लोकांविरुद्ध आक्रमक कृती आणि भयंकर गुन्हे करू नये.
28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलच्या युतीने इराणवर हल्ला सुरू केला होता. या युद्धाला ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. इराणवर हल्ला करण्यापासून अमेरिका मागे हटत नाही. त्याचबरोबर इराणही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.
अमेरिकेने अलीकडेच क्रूड वाहतूक करणाऱ्या तीन इराणच्या जहाजांना लक्ष्य केले होते. इराणने अमेरिकेच्या दोन युद्धनौकांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली असतानाच अमेरिकेने हा हल्ला केला होता.






