US Iran War: कच्च्या तेलाच्या दरवाढीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; डिझेलवर होणार मोठा परिणाम ?
US Iran War: अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देश प्रभावित होत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाली आहे.

US Iran War: अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देश प्रभावित होत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स वाढवला आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या निर्यातीवरील कर कमी करण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नवीन दर आजपासून लागू होणार आहेत.
सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्क 8.5 रुपये प्रति लिटरवरून 15.5 रुपये प्रति लिटर केले आहे. त्याचबरोबर एटीएफच्या निर्यातीवरील कर 7.5 रुपये प्रति लिटरवरून 14.5 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. दुसरीकडे, पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क 4 रुपये प्रति लिटरवरून 2.5 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.
ब्रेंट क्रूडच्या दरातही वाढ झाली US Iran War:
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणि कंपन्यांचा नफा लक्षात घेऊन सरकार वेळोवेळी विंडफॉल कराचा आढावा घेते. त्याच प्रक्रियेअंतर्गत यावेळीही नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.
जुलै महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत सुमारे 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी एप्रिल, मे आणि जूनमध्ये सातत्याने घसरण नोंदवण्यात आली होती.
ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 2 टक्क्यांनी वाढून 84.73 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव हे त्याचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील धोका वाढला आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. US Iran War:
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती घसरल्यानंतर 1 जुलै रोजी सरकारी तेल कंपन्यांनी एटीएफच्या किमतीत सुमारे 5 रुपयांनी कपात केली होती. आता कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारने विंडफॉल टॅक्समध्ये नवा बदल केला आहे.






