US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प याचं मोठं विधान, म्हणाले “मी जिंकलो तर एका फोन कॉलवर रशिया-युक्रेन…”

US Election 2024 & Donald Trump :- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये (RNC) मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, मी केवळ एका फोन काॅलवर रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबविन. जर ते नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणुक जिंकले तर ते रशिया-युक्रेन युद्धासह जगातील सर्व संकटे एका टेलिफोन कॉल व्दारे दूर करतील. वास्तविक, डोनाल्ड ट्रम्प यांनी मिलवॉकी येथील आरएनसीमध्ये केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केले.
त्यांनी जो बिडेन प्रशासनावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सध्याच्या प्रशासनाने निर्माण केलेल्या सर्व अडचणी मी दूर करेन. अमेरिकेला पुन्हा तोच सन्मान मिळेल, अमेरिकेच्या सामर्थ्यावर कोणताही देश प्रश्न करणार नाही. आपली अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल. ट्रम्प असेही म्हणाले की, आपल्या सर्व सीमा सुरक्षित राहतील. त्यासाठी अमेरिकेत आयर्न डोम बांधू, त्यानंतर अमेरिकेकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही.
ट्रम्प यांनी विचारले, अमेरिकेत आयर्न डोम का नाही?
ट्रम्प म्हणाले की, इस्रायलकडे आयर्न डोम आहे. त्यांच्याकडे मजबूत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, परंतु यापैकी फक्त एक क्षेपणास्त्र लक्ष्यावर झेपावले. इतर देशांमध्ये अशी व्यवस्था का नसावी आणि आपल्याकडे का नाही? आम्ही आमच्या देशासाठी असाच एक लोखंडी डोम बांधू आणि कोणीही आमच्या देशाकडे ढुंकून पाहू शकणार नाही आणि आमच्या लोकांचे नुकसान करू शकणार नाही याची काळजी घेऊ.
चीनवर उपस्थित केले पुन्हा प्रश्न …
ट्रम्प यांनी कोविड-19 म्हणजेच कोरोनावरही विधान केले. त्यांनी या आजाराला चायनीज व्हायरस म्हटले आहे. या निवेदनावर उपस्थित लोकांमध्ये उत्साह दिसून आला. आपल्या कार्यकाळाची आठवण करून देताना ट्रम्प म्हणाले की, मी चीनसोबत केलेला सर्वोत्तम व्यापार करार होता. चीनने आपली 50 अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी केली होती, असे ते म्हणाले.
काय आहे आयर्न डोम…?
लाखो डॉलर्स खर्च करून इस्रायलने उभारलेली आयर्न डोम ही यंत्रणा ही एका मोठ्या बचावात्मक यंत्रणेचा एक भाग आहे. ही यंत्रणा यंत्रणा हल्ला करण्यात आलेलं रॉकेट नागरी भागांमध्ये पडण्यापासून रोखते आणि हे रॉकेट हवेतच नष्ट करण्यात येतं. या सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम अँटी मिसाइल म्हणतात. इस्रायलने या संरक्षण तंत्रज्ञानाद्वारे हमासचे 90 टक्के रॉकेट हल्ले हाणून पाडले आहेत.
‘आयर्न डोम’ ही फिरती हवाई संरक्षण यंत्रणा आहे. हे ‘राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स’ या इस्रायलच्या सरकारी संरक्षण संस्थेने विकसित केले आहे. आयर्न डोममध्ये रडार युनिट, क्षेपणास्त्र नियंत्रण युनिट आणि एकाधिक प्रक्षेपक असतात. ही संरक्षण यंत्रणा सर्व हवामानात काम करण्यास सक्षम आहे. आयर्न डोममधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र 70 किमीच्या परिघात हवेतच शत्रूचे रॉकेट नष्ट करते.






