US Canada Aviation Dispute: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात एक मोठे आणि आक्रमक पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी कॅनडावर अमेरिकन विमान उत्पादक गल्फस्ट्रीमविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांचे प्रतिउत्तर US Canada Aviation Dispute: राष्ट्रपती ट्रम्प यांनी आरोप केला की कॅनडाने गल्फस्ट्रीमच्या ५००, ६००, ७०० आणि ८०० मालिकेच्या जेट्सना जाणूनबुजून आणि बेकायदेशीरपणे प्रमाणपत्र नाकारले आहे. US Canada Aviation Dispute: त्यांनी याविषयी सांगताना गल्फस्ट्रीम जेट्स जगातील सर्वात आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत विमानांपैकी एक आहेत, तरीही कॅनडा वर्षानुवर्षे त्यांच्यासाठी मान्यता रोखत आहे. ट्रम्प यांनी हा दृष्टिकोन अमेरिकन कंपन्यांविरुद्ध भेदभाव करणारा असल्याचे म्हटले. तसेच अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिका आता कॅनेडियन-निर्मित बॉम्बार्डियर ग्लोबल एक्सप्रेस विमानांसह सर्व कॅनेडियन विमानांना प्रमाणपत्र रद्द करत आहे. त्यासोबतच त्यांनी “गल्फस्ट्रीम जेट्सना कॅनडाकडून पूर्ण प्रमाणपत्र मिळेपर्यंत हा निर्णय लागू राहील” असे स्पष्ट केले. ट्रम्प यांचा इशारा US Canada Aviation Dispute: ट्रम्प यांनी पुढे इशारा दिला की, जर कॅनडाने परिस्थिती त्वरित सुधारली नाही तर अमेरिका कॅनडामधून आयात होणाऱ्या सर्व विमानांवर ५० टक्के कर लादेल. या विधानानंतर अमेरिका आणि कॅनडामधील व्यापारी संबंधांमध्ये तणाव वाढण्याची भीती आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हा वाद केवळ विमान उद्योगापुरता मर्यादित राहणार नाही तर दोन्ही देशांमधील व्यापार आणि राजनैतिक संबंधांवरही परिणाम करू शकतो. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष कॅनडाच्या पंतप्रधानांच्या या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया आहे याकडे लागले आहे.