उर्वशी रौतेला तिच्या फॅशन टिप्स आणि मॉडर्न आउटफिट, ग्लॅमरस लुकसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या फॅशन फेस्टिव्हलमध्ये तिच्याकडून नवीन फॅशन ट्रेन्ड प्रस्थापित केले जात असतात. अलिकडेच एका अरब फॅशन वीकमध्ये तिच्या गेटअपवर सर्वांच्याच नजरा खिळलेल्या होत्या.
उर्वशीने या फॅशन फेस्टिव्हलमधील काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर देखील केले आहेत. त्यामध्ये तिने चक्क 24 कॅरेट सोन्याचे आय शॅडो बसवल्याचे दिसते आहे. स्वतः उर्वशीने हे अस्सल सोन्याचे आय शॅडो असल्याचे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तिच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांनीही खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वीही अशाच महागड्या आउटफिटमुळे उर्वशी चर्चेत आली होती. नेहा कक्कडच्या लग्नमध्ये उर्वशी चक्क 55 लाख रुपयांचा लहंगा परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी ती “व्हर्जिन भानुप्रिया’ मधील लीड रोल केला होता. याशिवाय “ब्लॅक रोज’या तेलगू सिनेमातही काम करणार आहे.