उर्मिला निंबाळकर गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद; समुद्रकिनारी दाखवला हॉट अवतार

Updated On:
Photo 1

मुंबई –  मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. उर्मिलाने प्रसिद्ध युट्यूबर म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून उर्मिला चाहत्यांच्या कायमच संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सध्या ती गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

येथील समुद्रकिनाऱ्यालगतचे तिचे काही बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत चिमुकला मुलगा अथांग देखील दिसत आहे. उर्मिलाने काळ्या रंगाचा टॉप आणि त्याच रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. यावेळी अथांगही गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहे. “गोव्यात पडी टाकलीय सध्या, त्यातीलच काही निवांत क्षण!” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

दरम्यान, उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘दुहेरी’, ‘बन मस्का’ या मराठी आणि ‘दिया और बाती हम’, ‘एक तारा’ या हिंदी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. मात्र सुरुवातीला मालिकांमध्ये काम करताना तिला काही वाईट गोष्टींचा अनुभव आला होता. एका मुलाखती दरम्यान तिने याबाबत खुलासा केला होता. उर्मिला म्हणाली होती की, “मी मालिकेच्या सेटवर गेल्यावर  माझ्याशी कोणी नीट बोलत नव्हते. काय सुरू आहे कळत नव्हतं. मग प्रोडक्शन हाऊसमधून एक मुलगी आली तिनं सांगितंल की चॅनेलने मला काढून टाकण्यात निर्णय घेतला आहे. त्या क्षणी मला वाटलं मी खूप शुन्य आहे, माझ्याहून शून्य किंमतीची या जगात कोणीही नाही असं मला वाटतं होतं.”

पुढे ती म्हणाली होती की, “मी सर्वांना मालिका सोडली असंच सांगितलं. पण कोणालाच माहित नव्हतं की, मला काढलं गेलंय. मी सेटवर माज करायचे म्हणून मला काढलं अशा चर्चा सर्वत्र होत होत्या. आपल्याबरोबर सगळ्या वाईट गोष्ट होत असतील तर ते सगळं बंद व्हाव असं आपलं मन आपल्याला सांगत असतं,'” असे सांगत उर्मिलाने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी

Munna Bhai MBBS Fame Actor : 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाला धडक; व्हिडिओ व्हायरल

Munna Bhai MBBS Fame Actor : 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाला धडक; व्हिडिओ व्हायरल

Bhagyashri Borse: 'Brown Is My Colour'! मराठमोळ्या भाग्यश्री बोरसेच्या ग्लॅमरस फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Bhagyashri Borse: 'Brown Is My Colour'! मराठमोळ्या भाग्यश्री बोरसेच्या ग्लॅमरस फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष