उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी उर्मट वर्तन – भाजप नेत्याला अटक

बलिया,(उत्तरप्रदेश) – जिल्हा दंडाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी उर्मट वर्तन करून त्यांना धमकावल्या प्रकरणी भाजपचे येथील स्थानिक नेते विनोद तिवारी यांना आज अटक करण्यात आली. तिवारी यांच्यावर आधीचेही एकूण बारा गुन्हे प्रलंबीत आहेत. तथापी या आरोपाचा तिवारी यांनी इन्कार केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आपल्याला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले व त्यांनीच माझ्याशी असभ्य वर्तन केले असा त्यांचा आरोप आहे. दरम्यान हे प्रकरण निवडणुकीशी संबंधीत आहे की नाही याचा लगेच उलगडा होऊ शकला नाही. दमदाटीचा हा प्रकार काल रात्री घडला होता. तिवारी यांनी आपल्या समर्थकांनाही येथे बोलावून हुल्लडबाजी केली असे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.