मुंबई – बॉलिवूडच्या माया नगरीत अनेक अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांत अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, अशा अनेक नायिका आल्या आहेत ज्यांनी याला उघड विरोध केला आहे. आता उर्फी जावेदने आपला कटू अनुभव शेअर केला. नुकतंच, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने खुलासा केला आहे की, तिला टीव्ही इंद्रास्ट्रीमध्ये अशा गोष्टींचा सामना कधीच करावा लागला नाही, परंतु अशा घटना घडल्या असल्याचे ती सांगते.
काय म्हणाली उर्फी जावेद कास्टिंग काउचबद्दल
बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने सांगितले की, ‘खरे सांगायचे तर मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असे काहीही पाहिलेले नाही किंवा अनुभवले नाही. हे क्षेत्र अतिशय स्वच्छ आहे. होय, माझ्यासोबत एक-दोन गोष्टी घडल्या आहेत पण मी एका व्यक्तीसाठी संपूर्ण इंडस्ट्रीला दोष देऊ शकत नाही. मला वाटतं प्रत्येक मुलीसोबत असं झालं असेल, कुणीतरी तिला सांगितलं असेल, की तुला माझ्यासोबत झोपावं लागेल. या इंडस्ट्रीतल्या जवळपास प्रत्येक मुलीला असा काही ना काही अनुभव आला असेल. असं होत राहत आणि यात मोठ्या मोठ्या नावांचा समावेश असल्याचे उर्फी म्हणते.
उर्फी जावेदने त्या दिवसांबद्दलही सांगितले जेव्हा ती बेघर होती तेव्हा तिने परिस्थितीसमोर हार मानली होती. असे अनेकवेळा घडले जेव्हा तिला कवीट करावेसे वाटले, तिला तिला जीवनही संपवायचे होते, पण यावर देखील तिने मात केली आणि अवघड प्रसंगांमध्ये मजबुतीने उभी राहिली.