नवी दिल्ली : लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीकडून मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी आपला निकाल upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईट जावून पाहू शकतात. यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यात आयोजित केली जाते. यामध्ये प्राथमिक परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत यांचा समावेश आहे. यावर्षी यूपीएससीची पहिली परीक्षा 16 जूनला आयोजित करण्यात आली होती. तर मुख्य परीक्षा 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर या तारखांना आयोजित करण्यात आली होती. मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. या मुलाखतीमधून जे उमेदवार पास होतील त्यांचं आयएएस, आयपीएस, आयएफएस यांसह विविध सेवांसाठी सिलेक्शन करण्यात येणार. यूपीएससीचा निकाल कसा पाहावा ? 1) सर्वात आधी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. 2) यानंतर होमपेजवरील ‘Whats New’ या ऑप्शनवर क्लिक करा. 3) त्यानंतर UPSC CSE मुख्य निकाल 2024 डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 4) लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासू शकता. 5) उमेदवारांनी निकालाची एक प्रत जतन करून त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.