Pune News : सेवाभावाची परंपरा कायम! युनिक मेडिकल फाउंडेशनकडून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर
Pune News : तसेच संस्थेमार्फत वारकऱ्यांना बिस्किटांचे याचे वाटप करण्यात आले.

पुणे : “युनिक मेडिकल फाउंडेशन पुणे १६” गेली १९ वर्षे पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांना पुणे व सासवड येथे मोफत औषधोपचार करीत असून, शुक्रवार (दि. १०-०७-२०२६) या दिवशी जनवाडी येथील विर बाजीप्रभू प्रशाला दिंडी क्र २४, दत्तवाडी येथील त्रिमूर्ती निवास व रविवार (दि.१२-०७-२०२६) सासवड येथील संत सोपान काका समाधी मार्गावरील शेती उद्योग भंडारचे जगताप बंधू यांच्या रहात्या घराच्या आवारात पंढरीच्या वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच संस्थेमार्फत वारकऱ्यांना बिस्किटांचे याचे वाटप करण्यात आले.
या वर्षी १,५०० वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला यात एकूण १,१०० वारकऱ्यांना इंजेक्शन देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर लोखंडे, उपाध्यक्ष सुभेदार श्री मोहन शेलार, कार्याध्यक्ष डॉ. राहुल लोखंडे, खजीनदार मानसी लोखंडे, सचिव श्री नारायण फणसे, सहकार्याध्यक्ष डॉ.सुप्रिया लोखंडे, डॉ.दिनेश हेडगिरे, डॉ.गणेश खाडे, डॉ अलकेश अगरवाल, नवांकुर क्लिनिकचे (सासवड) डॉ. प्रतिक मेमाने व डॉ. प्रियांका (शिंगोटे), डॉ. माधुरी व तन्मय जगताप, डॉ. आदिती मेमाने, वैशाली खंडागळे, पद्मा रमपुरे, वासंती कोयाळीकर, सौ. शिल्पा कांबळे, सौ.सुरेखा परब, सौ.मिना त्रिपुटे, श्री.केदार गोंजारी, रोहन किणिकर, संण्डे क्लब तर्फे सुनील भांडवलकर आणि त्यांची टीम, सैनिक शाळा सातारा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाश कदम यांनी उपयोगी औषधांची तसेच पेन किलर मलमांची मदत केली. जयवंत कुंभार यांचे शशांक मेडिकल हडपसर व विरपत्नी योगिता गिरीगोसावी यांचे कुणाल मेडिकल , ब्रिगेडिअर आनंद ठाकुर, ब्रिगेडिअर भाऊसाहेब घोरपडे, यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.





