Drishyam 3 | अभिनेता अजय देवगणचा पुढचा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही. परंतु हा चित्रपट दिग्दर्शक अभिषेक पाठक यांचा ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘दृश्यम 3’ असल्याची चर्चा आहे. याचसंदर्भात आता एक अपडेट समोर आली आहे. अजय देवगणने दृश्यम या क्राइम थ्रिलर चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये विजय साळगावकरची भूमिका साकारली होती. या भूमिकेत त्याला चांगलेच पसंती मिळाली. आता, तो पुन्हा एकदा या भूमिकेत दिसणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या वृत्तानुसार, ‘दृश्यम ३’ या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात सुरू होणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं चित्रीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मेकर्स प्री-प्रोडक्शनचं काम करत आहेत. 12 डिसेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरू होणार आहे. पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईतच वायआरएफ स्टुडिओत होईल. ‘दृश्यम’ हा अजय देवगणचा एक लोकप्रिय चित्रपट आहे. मागील दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘दृश्यम’चा पहिला भाग 2015 साली आला होता. 48 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 110.40 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसरा भाग 2022 साली आला होता. चित्रपट बनवण्यासाठी मेकर्सनी 50 कोटी रुपये खर्च केले होते. जगभरातून या चित्रपटाने 342.31 कोटी रुपये कमावले होते. दोन्ही भागांचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनीच केलं होतं. त्यामुळे सर्वजण दृश्यम ३ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. हेही वाचा: “चिखलात कमळ असत पण राज्यात ते…”; शिवसेनेच्या प्रवक्ताच्या पोस्टने खळबळ म्हणाले “भगव्याची शक्ती यांसमोर…”