हडपसरमध्ये नवीन कालव्याला गळती

Updated On:

पाटबंधारे विभागाकडून तातडीने दुरुस्ती सुरू

हडपसर : कामठेमळा येथून वाहणाऱ्या नवीन मुळा-मुठा कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे . गळतीमुळे पाणी आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये शिरले आहे. हा प्रकार शुक्रवारी समोर आला होता.  त्यावर कालव्याची दुरूस्ती करण्याची मागणी नगरसेवक मारूती तुपे व नगरसेवक योगेश ससाणे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पाटबंधारे विभागाने ही दुरुस्ती सुरू केली आहे. कालव्याची भिंत आणि पुलाच्या भरावातून हे पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. सध्या आवर्तन सुरू असल्याने हा कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. ही परिस्थिती पुढे काही दिवस अशीच राहिली, तर भविष्यात कालव्याचा भराव फुटण्याची शक्यता  होती. त्यामुळे कालव्याची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक तुपे व ससाणे यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली.

यावर खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी पाहणी करत विसर्ग बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कालव्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली. हे काम आणखी दोन दिवस चालणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

2026-09-05 15:57:29

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

PMC News : चिंध्या, फर्निचरच्या कचऱ्यावर होणार प्रक्रीया; स्थायी समितीत प्रस्ताव दाखल, २० वर्षात होणार ७४ कोटींचा खर्च

2026-08-31 20:01:16

PMC News : चिंध्या, फर्निचरच्या कचऱ्यावर होणार प्रक्रीया; स्थायी समितीत प्रस्ताव दाखल, २० वर्षात होणार ७४ कोटींचा खर्च

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये 'रागाने का बघतोस' म्हणत तरुणाला लुटले; 87 CCTV तपासून सराईत गुन्हेगार जेरबंद

2026-08-22 19:03:00

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये 'रागाने का बघतोस' म्हणत तरुणाला लुटले; 87 CCTV तपासून सराईत गुन्हेगार जेरबंद

Diveghat Traffic advisory : दिवेघाटातून जाणार असाल तर थांबा! उद्या दुपारी 12 ते 2 वाहतूक पूर्ण बंद

2026-08-18 22:13:27

Diveghat Traffic advisory : दिवेघाटातून जाणार असाल तर थांबा! उद्या दुपारी 12 ते 2 वाहतूक पूर्ण बंद

Reels Star Attack: दोन रिल्स स्टार ग्रुपमध्ये राडा! तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोन तरुणींसह ३ जणांना अटक

2026-08-17 06:15:23

Reels Star Attack: दोन रिल्स स्टार ग्रुपमध्ये राडा! तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोन तरुणींसह ३ जणांना अटक