Upcoming IPO: गुंतवणुकीचा विचार आहे? बाजारात येतायत ‘हे’ 3 आयपीओ, जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO List: तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. या आठवड्यात बाजारात तीन नवीन आयपीओ (IPO) खुले होणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे गुंतवणुकीची योग्य संधी आहे. यूनिमेक एअरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड (Unimech Aerospace and Manufacturing Limited), सोलर91 क्लिनटेक लिमिटेड (Solar91 Cleantech Limited) आणि अन्या पॉलिटेक अँड फर्टिलाइजर्स लिमिटेड (Anya Polytech & Fertilizers Limited) या तीन कंपन्यांचे आयपीओ पुढील आठवड्यात खुले होणार आहेत.
यूनिमेक एअरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड
यूनिमेक एअरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडच्या आयपीओचे सबस्क्रिप्शन 23 डिसेंबरला सुरू होईल. तर 26 डिसेंबरला सबस्क्रिप्शन बंद होईल. याचे लिस्टिंग 31 डिसेंबरला आहे. या आयपीओच्या शेअर्सची किंमत 745-785 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. तर लॉट साइज 19 शेअर्सची आहे.
सोलर91क्लिनटेक
सोलर91 क्लिनटेकच्या आयपीओमध्ये तुम्ही 24 ते 27 डिसेंबरदरम्यान गुंतवणूक करू शकता. याचे लिस्टिंग 1 जानेवारी 2025 ला आहे. आयपीओच्या शेअर्सची किंमत 185-195 रुपये ठरवण्यात आली असून, याची लॉट साइज 600 शेअर्स एवढी आहे. म्हणजेच तुम्हाला 600 शेअर्स खरेदी करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
अन्या पॉलिटेक अँड फर्टिलाइजर्स लिमिटेड
अन्या पॉलिटेक अँड फर्टिलाइजर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ 26 डिसेंबरला उघडेल. तर 30 डिसेंबरपर्यंत याचे सबस्क्रिप्शन घेता येईल. शेअर्सचे लिस्टिंग 2 जानेवारीला होईल. या आयपीओच्या शेअर्सची किंमत 13-14 रुपये आहे. तर लॉट साइज 10 हजार शेअर्स एवढी आहे.
या तिन्ही शेअर्सला ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नक्कीच चांगली संधी आहे.
(नोंद – लेखामध्ये केवळ शेअर्स व आयपीओबाबत माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





