कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुणा गोपीनाथ केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी म्हणून सोमनाथ पटाईत यांनी ही निवड घोषित केली. वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सांगळे, सदस्य प्रविण कांगणे, जनार्दन कांगणे, शरद वाकळे, रंजना राजेंद्र सोनवणे, सरला केशव डोंगरे,उज्ज्वला शंकर माळी यांच्या उपस्थितीत बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी अरुणा गोपिनाथ केदार यांच्या नावाची सूचना सदस्या उज्ज्वला शंकर माळी यांनी मांडली. त्यास रंजना सोनवणे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी केदार यांचे नाव घोषित केले. अरुण केदार या गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे व्हाईस चेअरमन गोपीनाथ केदार यांच्या पत्नी आहेत.उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर. केदार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर सत्कार केला.