नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उत्तर प्रदेशातून सात उमेदवारांची घोषणा केली आहे. सातपैकी सहा उमेदवार नवीन आहेत तर सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, प्रदेश सरचिटणीस अमरपाल मौर्य आणि यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले आणि काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये सामील झालेले आरपीएस सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तसेच आग्रा शहराचे माजी महापौर नवीन जैन, गाझीपूर सदरच्या माजी आमदार संगीता बलवंत बिंद, मुगलसरायच्या माजी आमदार साधना सिंह आणि मथुराचे माजी खासदार तेजवीर सिंह यांनाही उमेदवारी दिली आहे.
राज्य विधानसभेतील भाजपच्या सदस्यांची संख्या लक्षात घेता भाजपचे सर्व उमेदवार राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येणार हे निश्चित आहे. जातीय समीकरण सोडवण्यासाठी पक्षाने एक ब्राह्मण, एक वैश्य, एक ठाकूर आणि चार मागासवर्गीय (कुर्मी, मौर्य, जाट आणि बांध) उमेदवार दिले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.