UP Election: विनोद तावडेंना मानाचं पान; थेट विजयी रथात स्थान

Updated On:

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. या ट्रेंडमध्ये भाजपने 270 चा टप्पा ओलांडला आहे. भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात उत्सव साजरा करण्यात येतोय.

भाजपच्या विजयानंतर दिल्लीत माजीमंत्री विनोद तावडे यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढलेल्या विजयी रॅलीत तावडे हे जेपी नड्डा यांच्या बाजुला गाडीत उभे राहून लोकांचं अभिनंदन स्वीकारत होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेल्या तावडेंना काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये बढती देण्यात आली आहे. राष्ट्रीय राजकारणामध्ये तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती झालेल्या तावडे यांना या निमित्ताने राष्ट्रीय राजकारणात पक्षाने मोठी संधी दिल्याची चर्चा सुरू होती. त्याची प्रचिती आज त्यांच्या समर्थकांना आली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Vinod Tawde : सपसाठी पीडीए म्हणजे पराया धन अपना; विनोद तावडे यांचे टीकास्त्र

2026-09-05 22:32:03

Vinod Tawde : सपसाठी पीडीए म्हणजे पराया धन अपना; विनोद तावडे यांचे टीकास्त्र

MALLIKARJUN KHARGE : शुद्धीकरणाचा वाद: "२४ दिवसांनंतरही एफआयआर दाखल..." ; खरगेंचे जेपी नड्डा यांना पत्र

2026-09-03 11:41:49

MALLIKARJUN KHARGE : शुद्धीकरणाचा वाद: "२४ दिवसांनंतरही एफआयआर दाखल..." ; खरगेंचे जेपी नड्डा यांना पत्र

BJP Gen Z Outreach : तरुण मतदारांसाठी भाजपची खास टीम; स्मृती इराणी, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी

2026-08-22 15:52:11

BJP Gen Z Outreach : तरुण मतदारांसाठी भाजपची खास टीम; स्मृती इराणी, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी

Vinod Tawde: काल नवी जबाबदारी, आज आणखी मोठं पद; विनोद तावडेंची उत्तर प्रदेशसाठी वर्णी

2026-08-18 11:28:13

Vinod Tawde: काल नवी जबाबदारी, आज आणखी मोठं पद; विनोद तावडेंची उत्तर प्रदेशसाठी वर्णी

Maharashtra Politics : भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या 'या' ५ दिग्गजांचा समावेश

2026-08-17 16:26:54

Maharashtra Politics : भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या 'या' ५ दिग्गजांचा समावेश