UP Election Result: जेलमध्ये असलेल्या नेत्याच्या पत्नीचा विजय; भाजप उमेदवाराचा केला परभव

लखनौ – उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. या ट्रेंडमध्ये भाजपने 250 चा टप्पा ओलांडला आहे. भाजपचे स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. मात्र त्याचवेळी अमेठीतील जागेवर भाजपला पराभव स्कीकारावा लागला आहे.
अमेठी विधानसभा मतदार संघातील यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी होती. निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच समाजवादी पक्षाच्या वतीने महाराजी प्रजापती यांनी स्वत:ला उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांचा या निवडणुकीत विजय झाला.
बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले दिग्गज नेते गायत्री प्रजापती निर्दोष असल्याचं सांगत महाराजी प्रजापती आणि त्यांच्या मुलाने मतदार संघात भावनिक प्रचार केला. या जागेवर भारतीय जनता पक्षाचे संजय सिंह पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र महाराजी प्रजापती यांनी संजय सिंह यांना मात देत विजय खेचून आणला.
पती तुरुगांत असूनही त्यांच्या पत्नीने विजय मिळवला. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्याच्या विजयाची चर्चा सुरू आहे.





