UP ATS। दिल्लीतील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील मदरशांबाबत कठोर पाऊल उचलले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने सर्व मान्यताप्राप्त तसेच अनधिकृत मदरशांना आपल्या मौलानांचे आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण तपशील उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सादर करण्याचे बंधनकारक आदेश दिले आहेत. या नव्या प्रोटोकॉलनुसार खालील माहिती देणे बंधनकारक : UP ATS। सर्व मौलवी, शिक्षक आणि धार्मिक शिक्षकांचे नाव, कायमचा पत्ता, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि इतर ओळखपुरावा दस्तऐवज मदरशात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची पूर्ण माहिती व मोबाइल नंबर समोर आलेल्या माहितीनुसार , हा केवळ डेटा गोळा करण्याचा सर्व्हे नाही तर मदरशांमधील संशयित व्यक्तींची वेळीच ओळख पटवण्यासाठीचा “सुरक्षा ऑडिट” आहे. गेल्या काही महिन्यांत काही मदरशांत इतर राज्यांतील तरुणांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच ही व्यापक पार्श्वभूमी तपासणी हाती घेण्यात आली आहे. दिल्ली स्फोटानंतर देशव्यापी हाय अलर्ट दिल्लीत नुकत्याच घडलेल्या स्फोटांच्या मालिकेनंतर राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. केंद्रीय एजन्सींनी सर्व राज्यांना धार्मिक व शैक्षणिक संस्थांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच दृष्टीने उत्तर प्रदेश ATS ने मदरशांकडून तपशील मागवण्याची मोहीम तातडीने हाती घेतली आहे. इंटिग्रल युनिव्हर्सिटीवरही नजर UP ATS। मदरसे आणि धार्मिक संस्थांबरोबरच काही खाजगी विद्यापीठेही तपासाच्या रडारवर आहेत. दिल्ली स्फोट प्रकरणात लखनौच्या इंटिग्रल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक परवेझ अन्सारी यांचे नाव समोर आल्यानंतर या विद्यापीठाची विशेष चौकशी सुरू झाली आहे. सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे की, हे पाऊल कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा संस्थेविरुद्ध नाही, तर संभाव्य धोक्यांना आधीच हेरून राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या धोरणाचा भाग आहे. गुप्तचर यंत्रणांनी विद्यापीठ प्रशासनाला खालील माहिती सादर करण्यास सांगितले जम्मू-काश्मीरमधील सर्व प्राध्यापकांची ओळख व कागदपत्रे जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण नोंद परदेशी विद्यार्थ्यांची संख्या, त्यांचे अभ्यासक्रम, व्हिसा तपशील इत्यादी