Maharashtra Weather Update | राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने उकाडयापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. गुजरात लगतच्या अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झल्याने हवामान विभागाने पुढील चार दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली असून, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. त्यामुळे पुण्यातही हवामानात बदल जाणवू लागला आहे. पश्चिम भारतात तयार झालेल्या चक्रिय स्थितीमुळे ढगांची निर्मिती अपेक्षेपेक्षा थोडी उशिरा होत आहे. मात्र, यात बदल होऊन मंगळवारी देखील पावसाची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने पुढील चार दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. Maharashtra Weather Update | यलो अलर्ट जारी याशिवाय जळगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात दोन दिवस ढगाळ वातावरण पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. मंगळवारपासून ४ दिवस मेघगर्जनेसह विजेच्या कडकडात पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मेघगर्जना विजांचा कडकडाट होऊन, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. Maharashtra Weather Update | फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान सोमवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसादरम्यान वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. वाशीम शहरासह रिसोडमध्ये सोमवारी दुपारी अवकाळी पावसासोबत गारपीट झाली. तर नाशिक जिल्ह्यात मनमाड, तर जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, चोपडा तालुक्यांत गारपिटीसह पावसाचा तडाखा बसला. हेही वाचा: अग्रलेख : प्रांजळ विधान