Unseasonal Rain : राज्याला पुन्हा अवकाळीचा धोका ; हवामान विभागाने ‘या’ भागात वर्तवली पावसाची शक्यता

Unseasonal Rain : राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचे दिसून येत असून त्यातच पुन्हा एकदा अवकाळीचा धोका निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता राज्यावर पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे. त्या नुसार, आज राज्याच्या काही भागात पावसाच्या सारी बरसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसात लोकांना आणखी कडाक्याची थंडी सोसावी लागणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने ,राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानातील बदलामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.





