उन्नाव बलात्कार पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी

आई, काकूचा अपघातात मृत्यू

नवी दिल्ली : भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर आरोप करणारी उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणी भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पीडित तरूणीच्या आई आणि काकूसह वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. तर, पीडित तरूणी आणि तिच्या वकील यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना लखनऊ येथील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पीडित तरूणी कुटुंबासह रायबरेली तरूंगात असलेल्या आपल्या काकाची भेट घेऊन परत येत असताना हा अपघात घडला. त्यांच्या कारला ट्रकने उडवल्याने हा भीषण अपघात झाला. कॉंग्रेसने या अपघाताबाबत संशय व्यक्त केला असून, उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसच्या आमदार आराधना मिश्रा यांनी याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.