जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं – रोहित पवार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ लागू केले आहे. तसेच राज्य लॉकडाऊन केले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला काही ठिकाणी गंभीरपणे घेण्यात येत नसल्याचे चित्र आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी खास ट्विट केलं आहे.
@Nawazuddin_S यांच्या ‘मांझी- द माऊंटन मॅन’ या चित्रपटातील “जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं” हा माझा एक आवडता डायलॉग आहे. आजही वेगळ्या अर्थाने याच डायलॉगप्रमाणे वागण्याची गरज आहे.
जोपर्यंत कोरोना पराभूत होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार!#IndiaFightsCorona pic.twitter.com/taQneizm5t
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 23, 2020
रोहित पवार काय म्हणाले?
‘नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या ‘मांझी- द माऊंटन मॅन’ या चित्रपटातील “जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं” हा माझा एक आवडता डायलॉग आहे. आजही वेगळ्या अर्थाने याच डायलॉगप्रमाणे वागण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोना पराभूत होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार! या विषाणूविरोधातील लढाईसाठी तुमचाही असाच एखादा डायलॉग असेल तर सांगा, त्यातील काही मी RT (रिट्विट) देखील करेल!,’ असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे.





