Zilla Parishad School: चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने ठोकले कुलूप; विद्यार्थ्यांची रस्त्यावर भरवावी लागली शाळा
Zilla Parishad School: पालक आक्रमक, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिरूर : तालुक्यातील चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. शाळेच्या गेटला कुलूप असल्याने शाळेत आलेल्या तब्बल ९१ विद्यार्थ्यांना रस्त्यावरच शाळा भरविण्याची वेळ आली.
या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शांताराम पानमंद दादाभाऊ पानमंद यांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. Zilla Parishad School
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेचा वर्ग रस्त्यावरच भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली. रस्त्यावर बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र पाहून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणात गुन्हा दाखल
चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील ९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे विद्यार्थी सकाळी शाळेत दाखल झाले. मात्र शाळेच्या दरवाजाला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीत प्रवेश करता आला नाही.
शाळेला परस्पर कुलूप लावण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला कोणी दिला, असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेमागे नेमके कोण आहे? शाळेला कुलूप लावण्यामागे कारण काय? तसेच शाळेचे कामकाज विस्कळीत करण्याचा हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला का? याचीही चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
दरम्यान, संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शाळेचे कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. Zilla Parishad School
हेही वाचा:
Aashram 4 : ‘आश्रम ४’मध्ये होणार नव्या चेहऱ्याची एन्ट्री; अभिनेत्याच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम






