पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनदरात वाढ करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 1 जानेवारी म्हणजेच नव्या वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. विद्यापीठाने भोजनालयाचे सदस्यत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शाकाहारी थाळीसाठी 33 वरून 38 रुपये दर निश्चित केले आहे. विद्यापीठाने दरवाढ केली असली तरी भोजनालयाची दर्जातही सातत्यपणा राहावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून होत आहे.
भोजनालयाचे सदस्य नसलेल्यांना ही थाळी 47 रुपयांना मिळणार आहे. मिनी मर्यादीत थाळीसाठी 28 रुपये दर राहील. याच थाळीचा सदस्य नसलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी 35 रुपये दर राहील. दरम्यान, बाजारपेठेत हॉटेल आणि भोजनालयात मिळणाऱ्या शाकाहारी थाळींच्या तुलनेत विद्यापीठातील भोजनालयातील थाळीची किंमत कमी आहे, असा दावा विद्यापीठाने केला जात आहे.
विद्यापीठातील जेवण महागल्याने अनेक सामान्य विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने या भोजनगृहास अधिकाधिक अनुदान उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून ही दरवाढ रोखता येईल. पण, हे करत असताना अन्नाच्या दर्जाबाबत देखील विशेष खबरदारी घ्यायला हवी. कोणाचेही नुकसान न होता विद्यार्थ्यांना कमी पैशात उत्कृष्ट अन्न मिळावे, त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलावीत.
– कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना