आता ‘पेन्शन’चं ‘टेन्शन’ संपणार ! केंद्र सरकारचा मोठा प्लॅन ; नवीन योजनेचा सर्वांना मिळणार लाभ

Universal Pension Scheme । केंद्र सरकार लवकरच पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा करण्यासही शक्यता आहे. या योजनेनुसार केंद्र सरकार देशातील प्रत्यक्ष नागरिकाला पेन्शन देण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदी सरकार एक नवीन युनिव्हर्सल पेन्शन योजना सुरू करण्यावर काम करत आहे. या पेन्शन योजनेमुळे, ज्या लोकांकडे नोकरी नाही आणि इतर कामाद्वारे आपला उदरनिर्वाह करत आहेत त्यांनाही आर्थिक सुरक्षा मिळू शकते.
केंद्र सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी ‘यूनिवर्सल पेन्शन योजना’ आणणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून या योजनेवर काम करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. ही योजना ऐच्छिक असेल, अशी माहिती आहेत. या योजनेत सदस्यांना स्वत: देखील आर्थिक योगदान द्यावं लागेल, त्यानंतर त्यांना पेन्शन मिळणार आहे.
सरकार या योजनेची अंमलबजावणी ईपीएफओतर्फे लाँच करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात पायाभूत सुविधांसंदर्भात काम सुरु असल्याची माहिती आहे. या संदर्भातील काम पूर्ण झाल्यास श्रम आणि रोजगार मंत्रालय इतर मंत्रालयांसोबत चर्चा करेल. यासंदर्भातील वृत्त एका हिंदी वर्तमानपत्राने दिले आहे.
नव्या योजनेत जुन्या योजनांचा देखील समावेश Universal Pension Scheme ।
सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या योजनेत जुन्या योजनांचा देखील समावेश केला जाईल. या योजनेत अधिक लोकांना सदस्य करुन घेतले जाऊ शकते. असंघटित क्षेत्रातील मजूर, व्यापारी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ मिळेल.18 वर्ष पूर्ण झालेला किंवा त्यापेक्षा अधिक वअसणारा व्यक्ती यात सहभागी होऊ शकतो. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळेल.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या योजनेत घेतलं जाईल. या दोन्ही योजना ऐच्छिक आहेत. दोन्ही योजनांमध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मिळतात. यामध्ये दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. अटल पेन्शन योजनेला देखील यामध्ये घेतलं जाऊ शकतं. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देखील त्यांच्या पेन्शन योजनांना यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी सांगू शकते. यामुळं सरकारी योगदान सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात वाटलं जाईल. पेन्शन रक्कम वाढण्यात याचा फायदा होईल.
अटल पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळते? Universal Pension Scheme ।
अटल पेन्शन योजनेचं खातं बँक किंवा पोस्टामध्ये उघडता येतं. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 18 ते 40 वयाच्या दरम्यान असावं लागतं. जेव्हा तुम्ही खातं उघडता त्यावेळी तुम्हाला नॉमिनीची माहिती द्यावी लागते. समजा एखादा व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेचा सदस्य होत असेल तर त्याला 1456 रुपये दरमहा भरावे लागतील. तर, याशिवाय एका व्यक्तीचं वय 18 वर्ष असेल तर त्याला दरमहा 210 रुपये भरावे लागतील. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 5000 रुपयांपर्यंत रक्कम पेन्शन मिळते. दरम्यान, जे लोक आयकर भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.





