US Aid To Bangladesh : अमेरिकेकडून बांगलादेशला 202 दशलक्ष डॉलरची मदत

US Aid to Bangladesh – अमेरिका बांगलादेशला २०२.२५ दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत करणार आहे. अत्याधुनिक विकास, युवक सक्षमीकरण, लोकशाही सबलीकरण, आरोग्य सुधारणा तसेच व्यापारी आणि आर्थिक संधींची व्याप्ती वाढवण्यासाठी ही मदत केली जाणार आहे. या संदर्भात राजधानी ढाक्यामध्ये अमेरिकेच्या आणि बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकताच एक करार करण्यात आला आहे. बांगलादशच्या अर्थ मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये ही माहीती देण्यात आले.
अमेरिकेकडून देण्यात येणारा हा मदतीचा निधी प्रामुख्याने सामाजिक, मानवी आणि आर्थिक संधी या प्रमुख ३ क्षेत्रांसह चांगले प्रशासन आणि त्यातील लवचिकतेसाठी दिला जाणार आहे.
बांगलादेशातील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी रविवारी अमेरिकेच्या उच्चपदस्थ शिष्टमंडळाची भेट घेतली आणि बांगलादेशच्या पुनर्बांधणीसाठी, महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यासाठी आणि चोरी झालेल्या मालमत्ता परत आणण्यासाठी अमेरिकेकडून पाठिंबा मागितला.
Israel Hamas War : हिजबुल्लाहकडून इस्रायली लष्करी तळ उद्ध्वस्त, 1300 ड्रोनसह केला राॅकेटचा मारा…
त्यांनी हंगामी सरकारसमोर असलेल्या अनेक आव्हानांची माहीती दिली. आपले प्रशासन अर्थव्यवस्थेचे फेरनियोजन, आर्थिक क्षेत्रांमध्ये सुधारणा सुरू करण्यासाठी आणि फेरप्रारंभ करण्यासाठी, तसेच न्यायपालिका, पोलिसांसारख्या संस्थांचे कामकाज निश्चित करण्यासाठी त्वरीत सक्रिय झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.





