#UnionBudget2022 LIVE : कर भराताना चुका राहिल्या असल्यास दुरुस्ती करण्याची संधी देणार

Updated On:

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. करोना  काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.

निर्मला सीतारमन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 – पुढील 3 वर्षात नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार ; रेल्वे संदर्भात मोठी घोषणा- ४०० नव्या गाड्या सुरू करणार

– एलआयसी  चा आयपीओ  लवकरच येणार 

– ‘हर घर, नल से जल’द्वारे घरांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची योजना

– २ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

–  शक्ती, वात्सल्य, सक्षम अंगणवाडी २.० योजना सुरू

– शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येतील

– देशाचा आर्थिक विकास दर 9 टक्क्यांहून अधिक राहील

 ‘सबका प्रयास’, हा मंत्र आपल्याला प्रगतीच्या दिशेनं पुढे नेईल 

– विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल, स्थानिक भाषेत शिक्षण

– देशाचा जीडीपी 9.2 टक्के राहण्याचा अंदाज

– रेल्वे, जल, हवाई वेगवान वाहतुकीसाठी गुंतवणूक करणार, १०० नवे कार्गो जाळे विणणार

 – गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना  प्रोत्साहन देणार

– शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार

– पुढील पाच वर्षांत ६० लाख नव्या रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य

– कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पांना नाबार्डच्या माध्यमातून मदत करणार

– 2022 मध्ये देशात 5G सर्व्हिस सुरु होणार

– पर्वतमाला योजनेतून डोंगराळ भागात प्रवास आणि पर्यटनाला चालना देणार

– यंदाच्या वर्षापासून देशात ई-पासपोर्ट उपलब्ध होतील आणि त्यात चिप्स असतील

– पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन हस्तांतरण शक्य

– देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार

– कर भराताना चुका राहिल्या असल्यास दुरुस्ती करण्याची संधी

– राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

– स्ट्रील स्क्रॅपवरील कर सवलत कालावधी वाढणार

– कॉर्पोरेट सरचार्च कमी करण्यात येणार

– सरकारी टेंडरचे नियम बदलणार, संपूर्ण प्रक्रिया Digital होणार

आणखी संबंधित बातम्या

President Droupadi Murmu : "भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल" - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

2026-01-25 21:36:00

President Droupadi Murmu : "भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल" - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत - उपमुख्यमंत्री

2023-01-30 21:52:10

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत - उपमुख्यमंत्री

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या जमावाला ‘अल्लाहू अकबर’ म्हणत उत्तर देणाऱ्या 'तरुणी'ला या संघटनेकडून पाच लाखांचं बक्षिस

2022-02-09 12:56:36

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या जमावाला ‘अल्लाहू अकबर’ म्हणत उत्तर देणाऱ्या 'तरुणी'ला या संघटनेकडून पाच लाखांचं बक्षिस

''हे...राम...भक्तांना, विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस''

2022-02-09 10:39:18

''हे...राम...भक्तांना, विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस''

हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर मलाला म्हणाली,'भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष ...'

2022-02-09 08:58:25

हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर मलाला म्हणाली,'भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष ...'