केंद्रीयमंत्री स्मृती इराणींविषयी वापरले अपशब्द; प्राध्यापकाला अटक
Updated On:

फिरोजाबाद – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने येथील एका प्राध्यापकाला अटक करून तुरूंगात पाठवण्यात आले आहे. शहरयार अली असे या प्राध्यापकाचे नाव आहे. ते एसआरके कॉलेज मध्ये इतिहास विभागाचे प्रमुख आहेत.
गेल्या मे महिन्यात त्यांनी स्मृती इराणींवर टीका करणारी एक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ नये म्हणून त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण तो अर्ज फेटाळला गेल्यानंतर त्यांनी आज अतिरीक्त सत्र न्यायाधिशांच्या कोर्टात शरणांगती पत्करली त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचा आदेश कोर्टाने दिला. आपले खाते हॅक करून ही पोस्ट दुसऱ्याच कोणीतरी टाकली होती अशी भूमिका प्राध्यापकांनी घेतली होती.





