नवी दिल्ली – केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांचे आज दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. पासवान यांचे चिरंजीव आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या पासवान यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
पासवान गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राजकारणामध्ये सक्रिय होते. पासवान यांनी लोकसभेची निवडणूक सर्वात पहिल्यांदा 1977 मध्ये लढवली होती. देशातील सर्वात लक्षणीय दलित नेत्यांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य होते. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सध्या त्यांच्याकडे ग्राहक व्यवहर, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी होती. “एनडीए’ सरकारच्या पूर्वीच्या टर्ममध्येही पासवान यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यांनी जनता दलातून वेगळे झाल्यावर लोकजाशक्ती पार्टी नावाच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आदींनी ट्विटरवरून रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।
Miss you Papa… pic.twitter.com/Qc9wF6Jl6Z— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 8, 2020