Share Market: बजेटनंतर ‘या’ 20 शेअर्समध्ये दिसू शकते तेजी, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का?

Union Budget 2025: मोदी सरकार 3.0 चा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शनिवार असतानाही आज शेअर बाजार सुरू राहणार आहे. मागील काही वर्षात अर्थसंकल्पाचा फारसा परिणाम बाजारावर दिसून आलेला नाही. मात्र, यावर्षी अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वांचेच लक्ष आहे.
मागील काही दिवसात बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. बाजारतील सततची घसरण, कमी सरकारी भांडवली खर्च यामुळे , या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होऊ शकतात.
मागील दोन अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावर्षी सरकारकडून पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात आहे. त्यामुळे वित्तीय व्यवहारांमध्ये संतुलन साधण्याऐवजी अर्थसंकल्प संरचनात्मक, धोरणात्मक बदलांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
मागील महिन्यभरात निफ्टीमध्ये 0.58 टक्क्यांनी आणि सेन्सेक्समध्ये सुमारे 0.80 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे. बाजारातील पडझड रोखण्यासाठी सरकारकडून काही घोषणा केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
या लार्जकॅप शेअर्समध्ये दिसू शकते तेजी
अर्थसंकल्पातील घोषणेनंतरआयसीआयसीआय बँक, एसबीआय, एल अँड टी, एचसीएल टेक, एम अँड एम, ट्रेंट, भारती एअरटेल, टायटन कंपनी, सन फार्मा आणि डिक्सन टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
या मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दिसू शकते तेजी
अर्थसंकल्पातील घोषणेनंतर इंडियन हॉटेल्स, कमिन्स इंडिया, बीएसई, गोदरेज प्रॉपर्टीज, कोफोर्ज, मेट्रो ब्रँड्स, आयपीसीए लॅब्स, एंजेल वन, विनती ऑरगॅनिक्स आणि जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसू शकते.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





