Union Budget 2024 । अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील हा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या अर्थसंकल्प सादरीकरणास सभागृहात सुरुवात केलीय. यामध्ये त्यांनी देशातील युवकांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. युवकांसाठी 2 लाख कोटींची तरतूद Union Budget 2024 । अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार देणार असल्याची महत्वाची घोषणा त्यांनी केली. तसेच कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 नव्या योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना मला आनंद होत आहे. असे त्यांनी म्हटले. २० लाख तरुणांना कोशल्य विकासाचे प्रशिक्षण Union Budget 2024 । त्यासोबतच यावर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ३० लाख युवकाच्या रोजगारासाठी सरकारची योजना असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच २० लाख तरुणांना कोशल्य विकासाचे प्रशिक्षण सरकारकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. देशांतर्ग उच्च शिक्षणासाठी १० लाखांपर्यंत सरकार मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.