अर्थसंकल्पाच्या सादरीकरणारा सुरुवात ; अर्थमंत्री म्हणाल्या,”अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित”

Union Budget 2024 । अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील हा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला. दरम्यान, त्यांनी आपल्या अर्थसंकल्प सादरीकरणास सभागृहात सुरुवात केलीय.
अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित Union Budget 2024 ।
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्प मांडत असताना त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि अन्न पुरवणाऱ्यांवर लक्षय केंद्रित करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतात महागाई नियंत्रणात आहे. हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित आहे.
Union Finance Minister Nirmala Sitharaman presents the first Budget of the third consecutive Modi government
FM says, “The people of India have reposed their faith in the govt led by PM Modi and re-elected it for the historic third term…” pic.twitter.com/kgCcvEMECx
— ANI (@ANI) July 23, 2024
रोजगार वाढवण्यावर सरकार भर Union Budget 2024 ।
पुढे त्यांनी “अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात आल्याचे म्हटले आहे. रोजगार वाढवण्यावर सरकार भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला. त्यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडला, ज्यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांना 2019 मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून, सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत, ज्यात या वर्षी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प आहे.





