Pimpri : वाळंज विद्यालयात विद्यार्थिनींना गणवेश जॅकेट वाटप
Updated On:

कार्ला : मुळशी तालुक्यातील आंबवणे येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीना गणवेशावरील जॅकेट चे वाटप करण्यात आले.
मुलींसाठी प्रवास करताना ओढणी वापरल्यास अडचणीचे होत आहेत, अशी खंत मुख्याध्यापक भटू देवरे यांनी व्यक्त केली होती. परिसरातील पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता कोराई गड शिक्षण संस्था संचालिका व आंबवणे गावाच्या माजी आदर्श सरपंच यांनी आपल्या जाई वात्सल्य फाउंडेशन च्या वतीने सर्व मुलींना जॅकेट व प्रत्येक विद्यार्थ्यास टाय देण्याचं ठरवले. आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून शाळेत येऊन डॉ जयेश शेठ, सुरेश कालेकर, नंदकुमार वाळंज, वत्सलाताई वाळंज या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोफत जॅकेट वाटप करण्यात आले. पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.





