केडगाव : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

Updated On:

यवत : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असलेल्या मोहन जनरल सेंटर या हॉस्पिटलमध्ये आज दिनांक 28 एप्रिल रोजी 4 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार देत रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला.

दौंड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना रूणालय कमी पडत आहेत.  केडगाव येथे देखील मोहन जनरल हॉस्पिटल येथे  मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आज दुपारी येथील रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा संपल्यामुळे काही काळ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांनी दावा केला.

ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. तसेच दौंड तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी 4 उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती दिली. परंतु त्यापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळी रात्री उशिरा तहसीलदार संजय पाटील,  प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, दौंड तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व अधिकारी यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते.

घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पाहणी करून हि घटना कोणत्या कारणाने झाली याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. दरम्यान, या रुग्णालयात यापूर्वीदेखील रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज चार रुग्णांचा मृत्यू झाल्याबाबत तहसीलदार संजय पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान घटनेची माहिती देण्यास आरोग्य व महसूल विभागाने टाळाटाळ केली.

आणखी संबंधित बातम्या

Daund : सर्वसामान्यांचे घरकुल आवाक्याबाहेरच

2026-09-24 08:04:58

Daund : सर्वसामान्यांचे घरकुल आवाक्याबाहेरच

Gunthewari : केडगावनंतर आता दौंडमध्ये गुंठेवारी, बेकायदा दस्तांचा धडाका

2026-09-21 13:38:19

Gunthewari : केडगावनंतर आता दौंडमध्ये गुंठेवारी, बेकायदा दस्तांचा धडाका

Pune District : दूध भेसळीच्या चर्चेने दौंड तालुका हादरला

2026-09-15 07:47:16

Pune District : दूध भेसळीच्या चर्चेने दौंड तालुका हादरला

Tree Plantation: दौंड तालुक्यात २ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

2026-07-24 03:00:52

Tree Plantation: दौंड तालुक्यात २ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

Pune Water Crisis : पुणेकरांची चंगळ, बळीराजाची होरपळ! तब्बल ६६ हजार हेक्टर शेती धोक्यात; 'या' ३ तालुक्यांचे होणार वाळवंट?

2026-06-07 03:15:37

Pune Water Crisis : पुणेकरांची चंगळ, बळीराजाची होरपळ! तब्बल ६६ हजार हेक्टर शेती धोक्यात; 'या' ३ तालुक्यांचे होणार वाळवंट?