महाडच्या सावित्री नदीत बुडुन महाबळेश्वरच्या 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

पाचगणी : महाबळेश्वर शहरातील तीन जणांचा महाड येथे दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले असताना महाड येथील सावित्री नदीत बुडुन मृत्यु झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महाबळेश्वर शहरावर शोककळा पसरली असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. महाबळेश्वर शहरातील दिलावर शहाबुद्दीन नालबंद ,मुनावर शहाबुद्दीन नालबंद,जाहिद जाकीर पटेल हे तिघे जण महाड येथे दर्ग्याच्या दर्शनास गेले होते.
महाड येथील सावीत्र नदीत पोहताना हे तिघेजण बुडाल्याची माहिती समोर आली. महाड येथीस एनडीआरएफ टीमच्या माध्यमातुन या तिघांचा शोध घेण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले. दरम्यान तिघांचा मृतदेह कढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
महाड येथील दर्ग्याच्या दर्शनाला गवळी मोहल्ल्यातीस तिघेजण गेले असताना एकजण पोहताना बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी दोघे जण गेले मात्र या तिघांचा बुडुन दुर्दैवी मृत्यु झाला. महाड येथील दुर्घटना समजताच महाबळेश्वर शहरातुन माजी नगरसेवक यांनी महाडकडे धाव घेतली आहे.





