दुर्दैवी! बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू, गावात हळहळ
Updated On:

औरंगाबाद – बैल पोळ्यानिमित्त बैलांना धुण्यासाठी तलावावर गेलेल्या काका पुतण्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे घडली. पंढरीनाथ कचरू काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) असे मृत काका पुतण्याची नावे आहेत. पोळ्याच्या पूर्व संध्येला ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे काका पुतणे बैल धुण्यासाठी शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले होते. यावेळी बैलाने झटका दिल्याने पंढरीनाथ तलावात पडले. काका तलावात पडल्याचे पाहून पुतण्या रितेशने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. यात काका व पुतण्याला बाहेर निघता आले नाही. दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.





