सात वर्षांच्या पुतणीवर काकाचा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
Updated On:

नागपूर- नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या वाडीमध्ये दारुड्या काकानेच आपल्या सात वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काकाचे हे कृत्य कळाल्यावर नागरिकांनी त्यास मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अनिल अशोक पाटील असे आरोपी काकाचे नाव असून वाडी पोलीसांनी त्यास अटक केली आहे. आरोपी अनिल या परिसरात नेहमीच दारुच्या नशेत महिलांना छेडून असे कृत्य करत असल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती पोलिसांना केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.





