पुणे: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांना ना हरकत प्रमाणपत्र २४ तासांच्या आत दिले जाणार असून त्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज भरता येतील. इच्छुकांना पालिकेच्या वेगवेगळया २२ विभागांची थकबाकी नसल्याचे ना हकरत प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र, ते मिळण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी जातो. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे सादर केल्यास त्यांना घरबसल्या प्रमाणपत्र मिलणार असून अर्ज करतांना आधार कार्ड, मतदार व प्रॉपर्टी नंबर nocelection.pmc.gov.in या संकेत स्थळावर अपलोड करावे लागतील. त्यानंतर सर्व विभाग थकबाकीची ऑनलाइन पडताळणी होईल. थकबाकी असेल तर ती भरावी लागले. यानंतर २४ तासांत थकबाकी नसल्याचे प्रमाण पत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. प्रमाणपत्रासाठी सावरकर भवन येथे एनओसी देण्यासासाठी पाच अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक मदत कक्ष असेल. तेथे ऑफलाईन अर्ज भरण्यास मदत केली जाईल.