पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये विक्रांत बगाडे अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झाले आहेत. त्यांची पदभार स्विकारताच निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामाकाजाचे फेरवाटप केले. या संदर्भात कामकाज वाटपाच्या आदेशात आयुक्तांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली दक्षता व गुणनियंत्रण, नगररचना, लेखा, विशेष प्रकल्प हे विभाग ठेवले आहेत. तर अतिरिक्त आयुक्त १ विजयकुमार खोराटे यांच्याकडे उद्यान, स्थापत्य, निवडणुक, स्थापत्य उद्यान, अग्निशामक, क्रीडा, स्थापत्य प्रकल्प, शहरी दळणवळण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, वायसीएम रुग्णालय, वैद्यकीय विभाग हे विभाग सोपविले आहेत. अतिरिक्त आयुक्त २ तृप्ती सांडभोर यांच्याकडे अतिक्रमण, करसंकलन, बांधकाम परवानगी, समाज विकास, जल निःसारण, पर्यावरण अभियांत्रिकी, अभिलेख कक्ष, झोपडपट्टी पुनर्वसन, सुरक्षा आणि सर्व क्षेत्रीय कार्यालये यांचे कामकाज देण्यात आले आहे. महापालिकेत नव्याने रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त ३ विक्रांत बगाडे यांच्याकडे विद्युत मुख्य कार्यालय, जलशुध्दीकरण केंद्र से. २३, पाणी पुरवठा विभाग, भांडार, शिक्षण, पशुवैद्यकीय, भूमि आणि जिंदगी, माहिती व जनसंपर्क, स्थानिक संस्था कर आणि माहिती व तंत्रज्ञान, आयटीआय या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सहआयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सामान्य प्रशासन, आकाशचिन्ह व परवाना, कामगार कल्याण, कायदा, नागरी सुविधा केंद्र आणि कार्यशाळा हे विभाग सोपविण्यात आले आहेत.