#IPL2022 | उमरानने नोंदवला सर्वात वेगवान चेंडू

पुणे – सनराईजर्स हैदराबादचा वेगावान गोलंदाज उमरान मलिक यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्रत्येक सामन्यागणीक आपल्या गोलंदाजीचा वेग वाढवत आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात यंदाच्या स्पर्धेच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकला.
यापूर्वी उमरानने 153.1, 153.3, 152.9 किमी प्रती तास या वेगाने गोलंदाजी करत होता. मात्र रविवारच्या सामन्यात त्याने 154 किमी प्रती तास वेगाचा चेंडू टाकला. हा चेंडू त्याने ऋतुराज गायकवाडला टाकाला. या चेंडूवरच ऋतुराजने चौकार फटकावत अर्धशतक पूर्ण केले.
यंदाच्या मोसमात जे पाच सर्वात वेगवान चेंडू नोंदले गेले त्यातील चार चेंडू हे उमराननेच टाकले आहेत. यापूर्वी न्यूझीलंडचा वेगावान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने 153.9 किमी वेगाने चेंडू टाकला होता. तर उमारन मलिकने टाकलेले 153.3, 153.1 आणि 152.9 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकले होते. रविवारी त्याने 154 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकून आपलाच विक्रम मागे टाकला.





