Umesh Kamat | Priya Bapat – मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांच्या आवडीचे जोडपे म्हणजे ‘प्रिया बापट’ आणि ‘उमेश कामत’. अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र भूमिका साकारल्या आहे. आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर या दोघांही निर्माण केलं आहे. उमेश आणि प्रियाला प्रेक्षकांना ऑन अँड ऑफ स्क्रिन एकत्र बघायला नेहमीच आवडते. हे जोडपे सोशलवर सक्रिय असून या दोघांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या फोटोंना गमतीशीर व्हिडिओना नेटकरी कमेंट करतात. नुकतंच अभिनेता उमेश कामात याने त्याचा स्वतःच घर घेण्याचा किस्सा सर्वांशी शेअर केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना उमेशने त्याचा घर घेण्याचा किस्सा सांगितला. छोटं का होईना आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सर्वसामान्य लोक जशी ही इच्छा पुर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करतात. तसंच सेलिब्रेटींचे सुद्धा असते. प्रत्येक सेलिब्रेटी हे जन्मजात श्रीमंत नसतात. असं काहीसं उमेशचं देखील होत. त्याची आई सरकारी बॅंकेत नोकरी करायची. सरकारी नोकरदार असल्यामुळे त्यांना बॅँकेतर्फे राहायला रूम मिळाल्या होत्या. आई रिटायर होईपर्यंत ते तिथे राहायचे. मात्र, काही काळानंतर आई रिटायर झाल्यावर उमेशचं कुटुंब नेहरु नगर येथे राहायला गेले. काहीही झालं तरी आपलं घरं असावं ही इच्छा उमेशच्या मनातून जात नव्हती. त्याने वेगवेगळ्या शहरात घर शोधायला सुरूवात केली. पण घराच्या किंमती इतक्या गगनाला भिडलेल्या की तेवढ्या पैशांत घर घेणं सोप्प नव्हतं. पुढे उमेशचं प्रियाशी लग्न झालं. मग उमेशचं स्वप्न प्रियाचं झालं. दोघांनी कमावलेले पैसे एकत्र करुन आपलं हक्काचं घरं घ्यायचं ठरवलं. २०१२ मध्ये त्यांनी हक्काचं घर घेतलं. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे असलेली जमापुंजी संपलेली. पण तरीही त्यांनी हार न मानता परिस्थितीशी दोन हात करायचे ठरवले. आणि आज हे दोन्ही कलाकार यशाच्या उंच शिखरावर आहेत. त्यांचे चित्रपट, नाटक आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. दरम्यान, उमेश आणि प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, उमेश शेवटचा ‘माय-लेक’ या चित्रपटात झळकला होता. तर ‘रफूचक्कर’ या हिंदी वेब सीरिजमध्ये प्रिया शेवटची झळकली होती. लवकरच उमेश ‘येरे येरे पैसा-३’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.