भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उमेश भालसिंग

शेवगाव – निगडी पुणे येथील ग.दी .माडगुळकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी याबाबतच्या निवडीचे पत्र भालसिंग यांना दिले. यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील व योगेश मैड उपस्थित होते.
उमेश भालसिंग हे सन २०१४ पासून आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये सक्रीय असून यापूर्वी त्यांनी भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत तसेच उपाध्यक्ष व सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली वाघोली ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात सलग दोन वर्ष राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे.
जलसंधारण, वृक्षारोपन, शिक्षण , आरोग्य व कृषी या क्षेत्रात ही त्यांचे मोठे योगदान आहे. या निवडीबद्दल आ .राजळे, देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम आदींनी अभिनंदन केले. भालसिंग म्हणाले की, जिल्हयातून प्रदेश पातळीवर काम करण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व आगामी विधानसभेच्या दृष्टीने अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही दिली.





