उमर खालिदला अंतरिम जामीन ; किती दिवस राहणार कारागृहाबाहेर?

Umar Khalid Bail । दिल्ली दंगलीशी संबंधित खटल्यातील आरोपी उमर खालिदला आज न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. दिल्लीतील कर्करडूमा न्यायालयाने त्याला सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने उमर खालिदला 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उमर खालिदने आपल्या चुलत भाऊ आणि बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी १० दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता.
डिसेंबरच्या सुरुवातीला उमर खालिद आणि मीरान हैदर यांनी समानता, खटल्याला होणारा विलंब आणि दीर्घ कारावास या कारणांवरून जामीनही मागितला होता. या प्रकरणी पोलिसांनी जबाब सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. 2020 च्या दिल्ली दंगलीत 53 लोक मारले गेले आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर उमर खालिदला 13 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. चार वर्षांहून अधिक काळ ते तुरुंगात आहेत.
उमर खालिदवर हे आरोप Umar Khalid Bail ।
उमर खालिदने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला होता पण कोर्टाने त्याला खालच्या कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर उमरने आपली याचिका मागे घेतली. खालिदवर आयपीसी, 1967 शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आयपीसीच्या विविध कलमान्वयेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शरजील इमामला अद्याप जामीन मिळालेला नाही Umar Khalid Bail ।
आत्तापर्यंत उमरच्या खटल्याच्या सुनावणीच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत आणि अनेक वेळा याचिका फेटाळल्या गेल्या आहेत तर कधी न्यायाधीशांनी सुनावणीतून स्वत:ला दूर केले आहे. दिल्ली दंगलीतील आणखी एक आरोपी शरजील इमाम याला जामीन मिळू शकलेला नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती पण हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित असल्याने जामिनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नाही.





