लंडन : संरक्षण सल्लागार संजय भंडारी याला करचुकवेगिरी प्रकरणी निर्दोष ठरवण्याच्या विरोधात भारत सरकारकडून आव्हान याचिका दाखल करण्यास ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. संजय भंडारी हा संरक्षण क्षेत्रातील दलाल असून करचुकवेगिरी आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी तो भारतात वॉन्टेड आहे. रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमधील न्यायाधीश लॉर्ड जस्टिस टिमोथी हॉलरॉयड यांनी अल्पशा सुनावणीदरम्यान आव्हान याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला. लॉर्ड जस्टिस टिमोथी हॉलरॉयड आणि न्यायाधीश करेन स्टेन यांनी २८ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान संजय भंडारी याचे मानवी हक्कांच्या आधारे भारतात प्रत्यार्पण न करण्याचे अपील ग्राह्य धरले होते. मात्र भारतासाठी संजय भंडारीचे प्रत्यार्पण किती महत्वाचे आहे, हे सांगण्यासाठी एक आव्हान याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जाणार होती. . प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची अनुमती मागण्यात आली होती. मात्र बारत सरकारकडून सादर करण्यात आलेले दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालायासमोर विचारयोग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.