तब्बल ४४ वर्षानंतर उजनी धरणाची निच्चांकी पाणी पातळी

Ujani Dam । सोलापूरला उजनी धरणातुन देण्यात येणाऱ्या पाण्याने यंदा मात्र सोलापूरकरांनी निराशा केलीय. कारण या धरणाने यंदा तळ गाठला आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात धरणाची पाणी पातळी मागच्या तब्बल ४४ वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या निच्चांकी पातळीपर्यंत गेलीय. सध्या उजनी धरणात वजा ५९.३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरील सर्व पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.
शिल्लक पाणी बाष्पीभवनामुळे कमी Ujani Dam ।
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा म्हणावा तास शिल्लक नव्हता. धरणात जे पाणी आहे. ते देखील बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. त्यातच उजनी धरणात गाळ आणि वाळू मोठ्या प्रमाणावर साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. . त्यामुळे यंदा धरण कोरडे पडल्यामुळे धरणातील गाळ काढावा’अशी मागणी होत आहे.
दीड महिना तरी पाण्याची अडचण Ujani Dam ।
२०१४ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी धरणाची पाणी पातळी जूनमध्ये वजा ५९.०५ टक्केपर्यंत खाली गेली होती. (Solapur) यंदा मात्र मे अखेर धरण निच्चांकी पाणी पातळीवर गेले आहे. सरासरी जुलैपासून धरणात पाणी येण्यास सुरवात होते. त्यामुळे आणखी दीड ते दोन महिने पाणी कसे पुरवायाचे याची चिंता लागली आहे. पावसाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





