Udgir Municipal Council । उदगीर नगर परिषदेवर महायुतीला विजय मिळवण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपाची एक हाती सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा तब्बल दहा हजारांना विजय झाला आहे. याठिकाणी 40 पैकी 34 जागेवर महायुतीला विजय मिळवला आहे. उदगीर नगरपरिषद याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांची युती होती. 40 जागा आणि एका नगराध्यक्ष पदासाठी याठिकाणी लढत झाली. यात महायुतीच्या 34 जागा निवडून आल्या आहेत. यामध्ये 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तर 14 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. विरोधकांना केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. महायुतीच्या भाजपाचे उमेदवार स्वाती सचिन हुडे यांनी दहा हजार मतांची विजय आघाडी घेत नगराध्यक्ष पद ओढून आणला आहे. Udgir Municipal Council । उदगीर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीची युती करत या ठिकाणी विजय संपादन केला आहे. शिंदे गट या ठिकाणी स्वतंत्र लढला होता. काँग्रेसनेही या ठिकाणी शक्ती पणाला लावताना दिसून आले. मात्र या दोन्ही पक्षांना फक्त सहा जागेवरच समाधान मानावे लागले.