मुंबई – मुरूडमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. नार्वेकर यांच्यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उचलून धरला होता. यावर सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर नार्वेकर यांचा बंगला आहे. बंगल्याच्या बांधकामासाठी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. नार्वेकरांच्या बंगल्या सोबतच अन्य देखील बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे.
या कारवाईवर सोमया म्हणाले की, मिलींद नार्वेकरचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा. उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार असल्याचं सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
करून दाखविले !!!!
मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले
पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा
उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार pic.twitter.com/azpHTiFHlQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 22, 2021
सोमय्या यांनी नार्वेकर यांच्या बंगल्याच्या तोडकामाचा व्हिडीओ देखील शेअर केला. तसेच शिवसेना नेते अनिल परब यांना इशाराही दिला.